बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात लॉकडाऊन केले असतानाही जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. आरोग्य विभागाने २०३६ संशयितांचे स्वॅब काल घेतले होते. याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये ३१८ जण बाधित आढळून आले आहेत.
लॉकडाऊन झाल्यानंतर रूग्णांची संख्या कमी होईल असे आरोग्य विभागाला वाटत होते. मात्र दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्या वाढू लागली आहे. काल २०३६ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी ३१८ जण बाधित आढळूनअ ाले असून १७१८ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक आकडा आजही बीड तालुक्याचाच असून तो ८८ आहे. त्यापाठोपाठ अंबाजोगाई ५९, आष्टी ४२, धारूर ७, गेवराई ९, केज २५, माजलगाव ३१, परळी ३८, पाटोदा १८, वडवणी तालुक्यात १ रूग्ण आढळून आला आहे.