Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना आरटीओ कार्यालय शंभर टक्के बंद

आरटीओ कार्यालय शंभर टक्के बंद

बीड (रिपोर्टर):- लॉकडाऊनच्या काळात ५० टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती असावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या आहेत. मात्र या सुचनेकडे आरटीओ कार्यालयाने साफ दुर्लक्ष करत शंभर टक्के कर्मचारी गैरहजर असल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे होणार कशी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या बाबत वरिष्ठांनी लक्ष घालून ५० टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती असावी अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना द्याव्यात, अशी मागणी ऍड. शेख बक्शु यांनी केली.
जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केल्यानंतर प्रत्येक कार्यालयात ५० टक्के कर्मचार्‍यांनी हजेरी लावावी, असे बजावले होते मात्र आरटीओ कार्यालय शंभर टक्के बंद आहे. सदरील हे कार्यालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते आता हे कार्यालय पुर्णत: बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे होणार कशी? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना ५० टक्के प्रमाणात हजेरी लावण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पिपल्स फ्रंटचे नेते ऍड. शेख बक्शु यांनी केली आहे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...