Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रशरद पवारांवरील शस्त्रक्रियेनंतर राजेश टोपेंची पत्रकार परिषद; दिली महत्वाची माहिती

शरद पवारांवरील शस्त्रक्रियेनंतर राजेश टोपेंची पत्रकार परिषद; दिली महत्वाची माहिती


पुणे (रिपोर्टर):- पित्ताशयात खडे झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्रीच शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवारांना होणार्‍या वेदना थांबल्या सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवारांना चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल. त्यांच्यावर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पवारांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. डॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर पवारांचा पहिला फोटो त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. सुप्रिया यांनी केलेल्या या पोस्टमध्ये शरद पवार वृत्तपत्र वाचताना दिसत आहेत. सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत, असं या फोटोला कॅप्शन देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!