Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड समुह संसर्गावर ठेवा लक्ष, लोकाहो रहा दक्ष!

समुह संसर्गावर ठेवा लक्ष, लोकाहो रहा दक्ष!

प्रशासनाने मरगळ झटकावी, आयसोलेशन योग्य प्रकारे करा
आयसोलेट क्वॉरंटाईनवर लक्ष ठेवा, कॉन्टॅक्टट्रेसिंग वाढवा
महिनाभरात जिल्ह्यात एकूण ४९ बाधितांचा मृत्यू
६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून गेल्या महिनाभराच्या कालखंडात जिल्ह्यात तब्बल ६ हजार ४३९ कोरोना बाधीत आढळून आले असून ४९ जणांचा महिनाभरात कोरोनाने मृत्यू झाला आहे. सदरची संख्या काळजी वाढवणारी असल्याने आता लोकांसह शासन-प्रशासन व्यवस्थेने बेजबाबदारपणा सोडत सतर्क राहण्याची गरज आहे. आयसोलेशन योग्य प्रकारे होत नसल्याने आणि आयसोलेशनसह क्वॉरंटाईन असणार्‍या व्यक्तींवर ली ठेवले जात नसल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कॉंटॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याची गरज असून लॉकडाऊनला विरोध करणार्‍या सर्वसामान्यांनी कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे नसता कोरोनाचा भडका निश्‍चित असल्याचे जानकारांचे मत आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात र्लाकडाऊन करण्यात आले होते मात्र सर्वसामान्यांसह व्यापार्‍यांचा विरोध पाहता लॉकडाऊनमध्ये मोठी शिथीलता करण्यात आली. मात्र गेल्या महिनाभरात बीड जिल्ह्यातला कोरोनाचा उद्रेक पाहता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. महिनाभरात तब्बल ४९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ६ हजार ४३९ पेक्षा जास्त लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. जानेवारी महिन्यामध्ये १० आणि २० वर असलेला कोरोना बाधितांचा आकडा रोज ३०० च्या वर जाऊ लागल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय लॉकडाऊनच समजणार्‍यांनी आणि कोरोनाकडे दुर्लक्ष करत बेफिकीरीने राहणार्‍यांना आता शिस्तीत आणि सतर्क राहावे लागणार आहे. लॉकडाऊन हाच पर्याय पुढे करण्यापेक्षा आयसोलेशन योग्य प्रकारे होत आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आयसोलेशन आणि क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तींवर दुर्लक्ष केले जात असल्याचेही समोर येत आहे. जे लोक आयसोलेशन किंवा क्वॉरंटाईन आहेत ते सर्रासपणे बाहेर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे संसर्ग प्रचंड वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने कॉंटॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्याची गरज आहे.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....