Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडकेजगोरगरीबांना शिवभोजनाचा आधार वर्षभरात 60 हजार नागरिकांनी घेतला लाभ

गोरगरीबांना शिवभोजनाचा आधार वर्षभरात 60 हजार नागरिकांनी घेतला लाभ


केज (सय्यद माजेद):- सर्वसामान्यांना अगदी कमी दरामध्ये भोजन मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरू केली. या थाळीमुळे दररोज हजारो गोरगरीबांना लाभ मिळतो. केज तालुक्यामध्ये एका वर्षभरात साठ हजार नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला. दररोज दीडशे गोरगरीब थाळीचा लाभ उचलत आहेत.
महाविकास आघाडी राज्यात स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांच्या हितासाठी शिवभोजन योजना सुरू केली. अगदी माफक दरामध्ये ही थाळी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. प्रत्येक तालुक्यामध्ये शिवभोजन सुरू करण्यात आले. केज येथेही शिवभोजन सुरू असून गेल्या वर्षभरात 60 हजार गरजवंतांना याचा लाभ मिळाला. दररोज दीडशे लोक पाच रुपयांमध्ये जेवण करत आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्वसामान्य माणूस कमकुवत झालेला आहे. अशा सर्वसामान्यांना शिवभोजनाचा चांगलाच लाभ मिळत असल्याचे दिसून येत आहे. घेतला लाभ

Most Popular

error: Content is protected !!