बीड (रिपोर्टर):- चर्हाटा फाट्यावरील पेट्रोल पंपावर वाद झाल्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या एका कर्मचार्याने दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या समर्थकांकडून कर्मचार्याला धमकावले जात होते. रात्री काही जणांनी कर्मचार्याच्या घरावर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कर्मचार्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवानगीची मागणी केली.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जे.एन. बनसोडे यांनी काही दिवसांपुर्वी संदीपान बडगे व अभिषेक पवळ यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी संबंधितांकडून धमकावले जात असल्याचा आरोप कर्मचार्यांनी केलेला होता रात्री कर्मचार्याच्या गोकुळ अपार्टमेंट शिंदेनगर येथील घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत दहशत निर्माण केली. बनसोडे यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचाही प्रयत्न केला. अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे यात हल्लेखोर दिसत असल्याचे सांगण्यात आले. तसेच बनसोडे यांच्या घराच्या दारावर धमकीची चिठ्ठी देखील लावण्यत आली आहे. या प्रकरणी कर्मचारी बनसोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी पिस्टल देण्याची मागणी केली. तसे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.