Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडव्हाटसअ‍ॅपच्या मॅसेजची उपसभापती निलमताई गोर्‍हे यांच्याकडून

व्हाटसअ‍ॅपच्या मॅसेजची उपसभापती निलमताई गोर्‍हे यांच्याकडून

दखल 272 कोटी रूपयाच्या निधीला कृषी मंत्र्याकडून मंजुरी
बीड (रिपोर्टर):- सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजने अंतर्गत कृषी विभागाला प्रत्येक वर्षी नवीन विहिर आणि जुन्या विहिरीची दुरूस्तीसह कृषी योजनांसाठी निधी मिळतो. मात्र यावर्षी हा निधी मिळण्यास विलंब होत असल्याने आणि हा निधी जर मार्चच्या आत शासकीयस्तरावर पाठपुरावा होवून वेळेच्या आत मिळाला नसता तर राज्यस्तरावरून 272 कोटी रूपये लॅप्स झाले असते. म्हणून ही एक बाब बीड येथील एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या उपसभापती यांच्या मोबाईल व्हाटसअ‍ॅपवर एका संदेशाद्वारे त्यांच्या लक्षात आणुन दिले. आणि चक्क व्हाटसअ‍ॅप संदेशाची दखल विधानसभेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे यांनी घेवून 272 कोटीचा निधी कृषी विभागाला मिळून दिला. अनेक वेळा फोन करूनही आमदार, मंत्री त्या फोनची दखल न घेणारे आपण पाहतो मात्र साध्या एका व्हाटसअ‍ॅप संदेशाची दखल घेवून एवढा निधी मिळवून देणार्‍या निलमताई गोर्‍हे या संवेदनशिल राजकारणी आहेत हे परत एकदा सिद्ध झाले आहे.


ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून कृषी विभागाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेसाठी निधी दिला जातो. यावर्षी बीड जिल्ह्याला अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना नवीन विहिर खोदण्यासाठी इतर कृषीच्या योजनांसाठी 10 कोटी रूपयाचा निधी सामाजिक न्याय विभागाने देवू केला होता. मात्र हा निधी दिल्यानंतर वेळेच्या आत राज्यस्तरावरून याबाबतचा जीआर कृषी विभागाने काढणे गरजेचे असते. मात्र नोव्हेंबर महिना उलटून गेला तरी या बाबतची प्रक्रिया होत नव्हती. त्यामुळे बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, मनिषा तोकले आणि तत्त्वशिल कांबळे यांनी दतिल आदिवासींना विहिरीसाठी व इतर योजनेसाठी हा निधी मिळावा आणि यावर्षीचे पैसे लॅप्स होवू नये म्हणून याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांना मॅसेज केला. याबाबत अशोक तांगडे निलमताई दखल घेतली की नाही साक्षंक होते. मात्र ताईंनी तात्काळ दखल घेवून बीड येथील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तांगडे यांच्याकडून हा विषय समजून घेत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबतचा शासनादेश निर्गमीत केल्यामुळे बीड जिल्ह्यासह राज्याच्या कृषी विभागाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजनेसाठी 272 कोटी रूपयांचा निधी मिळवून दिला. हे फक्त डॉ.निलम गोर्‍हे यांच्या संवेदनशिलतेमुळेच शक्य झाले आणि त्यात तेवढीच दखल कृषी मंत्री भुसे यांनी घेवून शासनादेश काढला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!