Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- रामाच्या भूमीत रावणाचे पाठिराखे

अग्रलेख- रामाच्या भूमीत रावणाचे पाठिराखे

गणेश सावंत
प्रभु रामचंद्राच्या भुमीत रावणाचा हैदोस अवघ्या जगाने पाहिला. २१ वर्षाची पोर दिवसाढवळ्या फरफटत ओढत नेली गेली, तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला, मारहाण करण्यात आली, कंबरेचं हाड मोडण्यात आलं, जिभ छाटण्यात आली आणि नंतर याच रावणी पैदाशीच्या आरोपींनी थेट तिच्या भावाला तेरी बहन खेत मे मरी पडी हैं चल उठा लें असं सांगून रामाच्या भूमित रावणाचं राज्य असल्याचा जणु पुरावाच दिला. जेंव्हा मुलीच्या परिवाराने आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी रक्त बंबाळ अवस्थेतली पोरगी पोलीस ठाण्यात नेली तेंव्हा त्या मुलीला उपचारासाठी पाठवण्यापेक्षा तिचा अर्धमेल्या अवस्थेतील व्हिडीओ काढण्यात तिथली पोलीस यंत्रणा दंग राहिली. तेथून पुढेही जे काही रामाच्या भूमित घडले ते पाहून राम रडले की नाही? हे आम्हाला माहित नाही. परंतू सितामाईने मात्र हंबरडा फोडला असेल. आजही माझ्या शिलाची सुरक्षा नाही, आजही माझ्या चारित्र्याला अग्नि परीक्षा द्यावी लागते हे अठवून-अठवून सितामाईला घराघरात पैदा झालेल्या रामाच्या भूमितील रावणांचा किती तिटकारा आला असेल. प्रभु रामचंद्र आणि त्यांचे रामराज्य हे आमचे धोरण आहे असा दावा करणारे भाजपाचे उत्तर प्रदेशातील भगवेधारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात रावणाचा झालेला हा पराकोटीचा हैदोस आदित्यनाथांना दिसू नये अथवा हिंदुत्त्वाची गर्जना करणार्‍या तथाकथीत देशवासियांनाही याबाबत संताप येवू नये हे कोणाचे दुर्भाग्य? आम्ही षंड झालो आहोत का? नपुंसक झालो आहोत का? आम्हाला संवेदना उरल्या नाही का? आम्हाला स्वाभिमान, अभिमान राहिलाच नाही? आम्ही फक्त पैशावरील मता पुरते आणि बेगडे समर्थन करण्यापुरते उरले आहोत का? असे एक ना अनेक प्रश्‍न आज मित्तिला या प्रकरणातून पडायला हवेत. परंतू ते सर्वांनाच पडले असतील असे नाही. कारण एवढी मोठी महाभयानक घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेश शासन, प्रशासन व्यवस्थेने जे काही कटकारस्थान केले ते मुलीवर झालेल्या बलात्कारापेक्षा लोकशाहीवरील आणि संविधानावरील झालेल्या बलात्काराची साक्ष देणारे होते. मग यालाच 
रामराज्य 
म्हणायचे का? हा सवाल आम्ही नक्कीच हिंदुवाद्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारू. मर्यादा पुरूषोत्तम प्रभु रामचंद्राच्या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखंड हिंदुस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकताच पार पडला. रामाचे नाव घेतल्याने यमही सळासळा कापतो असं आम्हाला कथांमधून आमचे आजी-आजोबा सांगायचे. आम्हालाही प्रुभ रामचंद्राच्या कथांमधून सत्त्याचा मार्ग, नित्तीमत्तेचा मार्ग धरण्याची उर्मी यायची. परस्त्रीला माता म्हणायला पाहिजे, तिचा आदर करायला पाहिजे ते आम्हाला रामाने शिकवले. परंतू रामाच्या कथांमधून माझ्या नावावर दुष्कर्म करा हे प्रभु रामाने आम्हाला कधीच शिकवले नाही. माझ्या नावावर सत्ता संपादन करून रावणी पैदाशीची वावटळ उठवा असही त्यांनी कधी म्हटलं नाही. राम नाम जपना, पराया माल अपना हे धोरण तर त्यांनी नक्कीच शिकवलं नाही. मुहमें राम, बगल मे छुरी बाळगा असं रामाने कधीच म्हटलं नाही. मग रामाची भूमी असलेल्या उत्तरप्रदेशात रावणी पैदाशी का वळवळ करतायत? रामाचे नाव घेवून भगवे वस्त्र परिधान करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या योगी आदित्यनाथांना रावणी पैदाशींची वळवळ का थांबवता येत नाहीये? हे प्रश्‍न आजचे नाहीत? जात, पात, धर्म, पंथाच्या नावावर जेंव्हापासून राजकारण सुरू झालं, मताचा जोगवा मागण्यात येवू लागला आणि या धर्माच्या राजकारणामध्ये कर्तव्याचा वर्म विसरून धर्मातल्या मर्माला तिलांजली देवून राजकारणी जेंव्हा सत्ता भोगू लागले तेंव्हाच रामराज्याचं रूपांतर रावण राज्यात होवू लागलं आणि तेच प्रभु रामचंद्राच्या भूमित पहायला मिळालं हे अखंड हिंदुस्तानचं दुर्भाग्य आहे. एका अबलेला फरफटत नेत तिच्यावर अत्याचार करून तिची जीभ छाटण्यापर्यंत रावणी पैदासी थयाथया नंगानाच करत होत्या आणि उत्तर प्रदेशचं शासन आणि प्रशासन हे अखंड प्रकरण दडपण्याचा प्रयत्न उभ्या देशाने पाहिलं तेव्हा नक्कीच तळपायाची आग मस्तकाला गेली. एवढं सारं होऊन 
बलात्कार झालाच नाही
असं जेव्हा सांगण्यात येऊ लागलं तेव्हा त्या मुलीने मरनासन्न अवस्थेत दिलेल्या जवाबाचे काय? साक्षात ती मरणाच्या दारात उभी असताना ती ओरडून स्वत:चे शील भ्रष्ट झाल्याचे खोटारडे आरोप करील का? तिच काय या देशातील कुठलीही महिला, कुठलीही मुलगी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे ओढून घेणार नाही. याच उत्तर प्रदेशात रामाच्या पावन भूमीत कधी काळी सीतामाईला आपल्या चारित्र्यासाठी अग्निपरिक्षा द्यावी लागली होती. तीही भूमी आहे आणि इथली प्रत्येक भगिनी ही सीतामाईच्या पावलावर चालणारीअ ाहे मग ती असा खोटारडा आड घेऊ शकेल का? तर याचं उत्तर नाही येतं. मुलीवर बलात्कार झाला नाही तर मग तिला फरफटत ओढत का नेण्यात आलं? ती नग्नावस्थेत आढळून कशी आली? तिला मारहाण का करण्यात आली? जे चार रावणी पैदासीचे नराधम तिला ओढत नेत होते, ते कशासाठी? तिची जीभ का छाटण्यात आली, असे एक ना अनेक प्रश्‍न बलात्कार झालाच नाही, म्हणणार्‍यांना आम्ही विचारू. छोट्या-मोठ्या प्रश्‍नावर एखाद्या राज्याला बदनाम करण्याचा विडा ज्या माध्यमांनी उचलला होता ती माध्यमे सत्यासाठी, न्यायासाठी, मनिषा वाल्मिकीच्या पाठिशी का उभे राहत नाहीत? प्रभू रामचंद्राच्या भूमीत रामराज्य असल्याचा दावा करणार्‍या योगी आदित्यनाथांना का सवाल विचारत नाहीत? कहा गया वह 
पुछता है भारतवाला, 
कही गई वह परदे पर दिखनेवाली झॉंसी की राणी? कुठं गेले सत्याचा आव आणणारे भक्त? कुठं गेले रामराज्याचा दावा करणारे नमो रुग्ण? हा संताप आमचा नाहीये, हा संताप खर्‍या राम भक्तांचा आहे. खरा राम तोच ज्याच्यात माणसाला माणसासारखी वागणूक देण्याची कुवत आहे. हा संताप आहे अखंड देशातील माणुसकी जागवणार्‍यांचा. पुछता है भारत… म्हणून स्टुडिओमधून अकांडतांडव करणारा अर्णव गोस्वामी याला हा रावणी पैदासीचा हैदोस दिसला नाही. स्वत:ला झॉंसी म्हणणारी कंगणा राणावत हिलाही मनिषाची किंकाळी ऐकू आली नाही. ‘खुब लढी मर्दानी वह तो थी झॉंकी राणी’ हे वाक्य उच्चारताच अंगात सणसणी भरते. काररण मरणानंतरही आपल्या अब्रूचे धिंडवडे निघू नये, आपल्या शरीराला वाईट हेतुने कोणी हात लावू नये म्हणून झॉंसीने जे केले होते ते कंगणाला बहुदा माहितही नसावं. परंतु केवळ राजकारण करण्याइरादे महाराष्ट्राला पाक संबोधणार्‍या कंगणाला केंद्र सरकार वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतं, मग प्रभू रामाच्या भूमीत मनिषा सुरक्षित का राहु शकली नाही? हा सवाल विचारायचा नाही का? आणि याचं उत्तर रामराज्याची भाषा करणार्‍या योगी आदित्यनाथांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना उभ्या देशाला द्यावा लागेल. आज प्रभू रामचंद्रांचं नाव घेताय आणि त्यांच्या नावानेच ठिकठिकाणी सीतामाईवर बलात्कार होताना उघड्या डोळ्यांनी पाहताय. कायदा-संविधान, लोकाशाही याचं वस्त्रहरण करताय हे सर्व गेल्या चार दिवसांच्या कालखंडात उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये पहायला मिळालं. किती मोठा हा 
लोकशाहीवरचा बलात्कार!
रावणी पैदासीच्या हैवाणांकडून झालेल्या अत्याचाराच्या वेदनांनी किंकाळत मनिषाने प्राण सोडले परंतु तिच्या किंकाळ्या उत्तर प्रदेशात रामराज्याचं दावा करणार्‍या योगी आदित्यनाथांच्या कानी पडल्या नाहीत. म्हणूनच तिचा मृत्यू झाल्यानंतरही तिच्या नशिबी घोर विटंबणा आली. हिंदुत्वाचा जयघोष करणार्‍या योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी सरकारला हे माहित असायला हवं. कुमारीका मुलगी मृत्यू पावल्यानंतर हिंदू धर्मात तिच्यावर कशा पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे असतात, परंतु नाही. रामाचे नाव घेऊन रावणी पैदासींनी केलेल्या कुकृत्यावर पांघरून घालण्यासाठी मनिषाचा मृतदेह रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात पेट्रोल टाकून चेतवून देण्यात आला, तो जाळण्यात आला. मनिषाचे शेवटचे दर्शनही तिच्या कुटुंबियाच्या नशिबी नव्हते. मनिषावर बलात्कार झाला नव्हता तर मग तिचा मृतदेह रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात का जाळण्यात आला? तिच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी उपस्थित का राहू देण्यात आले नाही?, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. उत्तर प्रदेशातील आदित्यनाथांचं सरकार धनदांडग्या रावणी पैदासींच्या पोरांचं पाप झाकण्याचा प्रयत्न करत होतं. हेही यातून उघड झालं आहे. विषय एकट्या मनिषाचा नाही. या देशातल्या शेकडो मनिषा रोज रावणी पैदासीच्या नराधमांसमोर बळी पडतायत आणि राज्यकर्ते याकडे सपशेल दुर्लक्ष करतायत. घर घर मे है रावण इतने राम कहॉंसे लावू? हे महणण्याची वेळ राज्यकर्त्यांच्या नपुंसक धोरणामुळेच येते हे दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश असो वा अन्य कुठलाही प्रदेश, राष्ट्र असो तिथे वेळोवेळी दिसून आले आहे. 
रामाच्या भूमीत 
रावणाचे पाठीराखे
कोण आहेत?  रावणी पैदासीच्या नराधमांनी केलेल्या कुकर्मावर कोण पडदा टाकत होते? तिथला जिल्हाधिकारी कुटुंबियांना का धमकी देत होता? विरोधी पक्षातील नेत्यांनाच नव्हे तर मीडियालाही पीडित कुुटुंबियांना भेटण्यापासून का रोखण्यात येत होते? त्या पीडित मुलीचा रात्रीतून अंत्यसंस्कार का करण्यात आला? यामागे आजमितीला जे काही एक-दोन वरिष्ठ अधिकार्‍यांचं निलंबन झालय त्या अधिकार्‍यांना सुचना देणारा कोण होता? असे एक ना अनेक प्रश्‍न जेव्हा सुटतील आणि उभ्या देशाला याचे खरे उत्तर मिळेल तेव्हाच रामाच्या भूमीत आजही प्रभू राम आहेत हा विश्‍वास निर्माण होईल नसता …..
 

Most Popular

error: Content is protected !!