Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनापत्रकार दादासाहेब बन यांचे कोरोनाने दुःखद निधन

पत्रकार दादासाहेब बन यांचे कोरोनाने दुःखद निधन


आष्टी (रिपोर्टर):- राज्यात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून आष्टी येथील पत्रकार दादासाहेब बन ( वय41 ) यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती.आष्टी येथील कोव्हीड सेंटरमध्ये त्यांच्यावर सुरुवातीला उपचार करण्यात आले.स्कोर वाढल्याने त्यांना अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दि.1 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. त्यांचे निधन झाले.तालुक्यातील कासारी या छोट्याशा गावातुन येऊन दादासाहेब बन यांनी 15 वर्षापुर्वी पत्रकारितेला सुरुवात केली होती.लोकाशा, प्रजापत्र ,संकेत ,इत्यादी वृत्तपत्रात त्यांनी काम केले होते.ते मनमिळावू स्वभावाचे होते.ते कडा-कासारी -शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य होते.त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, दोन मुले असा आहे.त्याच्या जाण्याने बन कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळल्याने त्यांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!