Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना डॉ. संतोष धूत यांच्या धूत हॉस्पिटलला कोरोना बाधीतांवर उपचार करण्याची परवानगी

डॉ. संतोष धूत यांच्या धूत हॉस्पिटलला कोरोना बाधीतांवर उपचार करण्याची परवानगी

आजपासून होणार कोरोना बाधितांवर उपचार सुरू
बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांसाठी देवदूत ठरलेले डॉ.संतोष धूत यांच्या धूत हॉस्पिटलला कोरोना बाधीतांवर उपचार करण्यास परवानगी मिळाली. आजपासून धूत हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू होणार आहेत. हॉस्पिटलमध्ये अत्याधूनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षभराच्या कालखंडात डॉ. संतोष धूत जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करत आले आहेत. बरे होऊन घरी गेलेल्या शेकडो कोरोना रुग्णांनी संतोष धूत यांना देवदूत संबोधून त्यांचा सन्मान केला आहे. आजही डॉ. संतोष धूत हे जिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. यापुढेही ते जिल्हा रुग्णालयात सेवा देणार असले तरी धूत हॉस्पिटलमध्येही कोरोना बाधीतांवर उपचार होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने धूत हॉस्पिटलला परवानगी दिली असून कोरोना रुग्णांवर चांगल्यात चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी अत्याधुनिक यंत्रणा धूत हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आली आहे. डॉक्टरबरोबर अनुभवी कर्मचार्‍यांचा स्टाफ असून डॉ. संतोष धूत यांच्या सोबत डॉ. अरुण बडे, डॉ. अर्चना धूत, डॉ. बाळासाहेब शेंडगे हे काम करणार आहेत. सदरच्या रुग्णालयात आजपासून कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू होणार आहेत.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....