लोककल्याणी कार्य करण्याच्या पवारांच्या सूचना
बीड (रिपोर्टर)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी आपल्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आज वर्च्यूअल रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्ते, पदाधिकार्यांना संबोधित केले. या वेळी बीडच्या राष्ट्रवादी भवनात मोठ्या संख्येने पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसाचे निमित्त साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना वर्च्यूअल रॅलीच्या माध्यमातून ऐकण्यासाठी जिल्हाभरातून पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्च्यूअल रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्य आणि देशातल्या चालूस्थितीसह लोक कार्याबाबत सूचना करत पक्षवाढीचे कानमंत्र दिले. या वेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.