Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमविद्यार्थीनीची सौताड्याच्या धबधब्यात आत्महत्या

विद्यार्थीनीची सौताड्याच्या धबधब्यात आत्महत्या


बीड (रिपोर्टर):- बारावी वर्गात शिकत असलेल्या एका 17 वर्षीय मुलीने सौताडा येथील धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती पाटोदा पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदना-साठी पाटोद्याच्या रुग्णालयात दाखल केला.
शुभांगी लक्ष्मण शिंदे (वय 17) ही बारावी वर्गाची मुलगी काल रात्री ती अचानक घरातून निघून गेली. रात्री तिचा शोध नातेवाईकांनी घेतला मात्र ती मिळून आली नाही. सकाळी सौताडा येथील धबधब्यात तिचा मृतदेह आढळून आला. तिने रात्रीच वरून उडी मारली होती. त्यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोटोदा पोलीस ठाण्याचे तांबे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Most Popular

error: Content is protected !!