बीड (रिपोर्टर):- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनाचे लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आज कोरोना चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. मुंबई येथील निवासस्थानात विलगीकरणात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना कोरोनाचे लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी आज सकाळी तातडीने कोरोना चाचणी केली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर क्षीरसागरांनी स्वत:ला मुंबई येथील निवासस्थानी विलगीकरण करून घेतले आणि तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात असलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी तसेच इतरांनीही खबरदारी घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.