Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeराजकारणगदारोळ! भाजपा उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; चार अधिकारी निलंबित

गदारोळ! भाजपा उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; चार अधिकारी निलंबित

ऑनलाईन रिपोर्टर
पाच राज्यांसह आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. गुरुवारी विधानसभेच्या ३९ जागांसाठी (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. या प्रकरणावरून मोठा गदारोळ उडाला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशील सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

आसाम विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. मतदानानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत एका गाडीत ईव्हीएम मशीन सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या गाडीमध्ये हे ईव्हीएम मशीन सापडले, ती कार भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. “ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं,” असं आयोगाने सांगितलं.

लोकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!