Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम चंदन चोरीची माहिती देणार्‍या शेतकर्‍याच्या शेतात पुन्हा पाच चंदनाच्या झाडाची चोरी पिंपळनेर...

चंदन चोरीची माहिती देणार्‍या शेतकर्‍याच्या शेतात पुन्हा पाच चंदनाच्या झाडाची चोरी पिंपळनेर पोलीसांविरोधात शेतकर्‍यात संताप


बीड (रिपोर्टर):- शेतातलं चंदन चोरीस गेल्याची माहिती पोलीसांना दिली की दुसर्‍याच दिवशी शेतातले पाच चंदनाचे झाड चोरीस गेले. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्या नंतर त्याच रात्री पुन्हा त्याच शेतातलं चंदनाचं झाड चोरून चंदन चोरांनी पिंपळनेर पोलीसांना आव्हान दिलं की पिंपळनेर पोलीसांच्या आशिर्वादाने परिसरात चंदन तस्करांची टोळी कार्यरत आहेत. यावर चर्चा होत असून सक्रीय झालेल्या चंदन चोरांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर चंदनाच्या झाडाची चोरी होवून तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. येथील बाबासाहेब विठ्ठल पतंगे यांच्या शेतातून दोन दिवसापुर्वी चंदनाचा एक झाड चोरीस गेलं. याची माहिती त्यांनी पिंपळनेर पोलीसांना दिली. पोलीसांना माहिती दिल्यानंतर त्या रात्री पाच झाडे पुन्हा चंदन चोरांनी चोरून नेले. या बाबत लेखी तक्रार केल्यानंतर पुन्हा त्याच शेतातलं एक झाड चोरीस गेलं. एकच शेतकरी दोन वेळेस पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पुन्हा त्याच्या शेतात चंदनाच्या झाडाची चोरी होते यामुळे तेथील पोलीस संशयाच्या भोवर्‍यात असून अखेर शेतकरी बाबासाहेब पतंगे यांच्या तक्रारी नंतर काल पिंपळनेर पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला खरा परंतू गेल्या तीन दिवसाच्या कालखंडात एका शेतकर्‍याच्या शेतातून ५० हजार रूपयापेक्षा जास्त रूपयाच्या चंदनाच्या झाडाची चोरी झाली. यामुळे शेतकर्‍यात चिंता व्यक्त केली जात असून चंदन तस्करांना तात्काळ जेरबदं करा अशी मागणी परिसरातून होत आहे.
मिस्टर भुतेकर लक्ष द्या
पिंपळनेर परिसरातील जनता ही कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांच्या पाठिशी नेहमीच राहिली आहे. मात्र अकार्यक्षम अधिकारी आला आणि त्याने कर्तव्यदक्षपणा दाखवला नाही, हप्तेखोरीला खत पाणी घातले की येथील जनता त्या विरोधात आवाज उठवते तेंव्हा परिसरातील अवैध धंद्यासह शेतकर्‍यांच्या शेतातून चंदन चोरणार्‍यांना तात्काळ आळा घाला आणि आपला कर्तव्यदक्षपणा दाखवा.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....