Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड ‘तो’ कलेक्टरांच्या पायावर पडला म्हणाला,साहेब मला कोरोना वार्डात राहु द्या

‘तो’ कलेक्टरांच्या पायावर पडला म्हणाला,साहेब मला कोरोना वार्डात राहु द्या


आई शेवटच्या घटका मोजतीय, मुलगा सोबत असण्याचं समाधान मिळेल
कोरोनाच्या भयंकर संकटात हृदयद्रावक संवेदनशिल वस्तुस्थिती मांडली जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीने

बीड | रिपोर्टर
जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांचा जिल्हा रूग्णालयामध्ये राऊंड चालू होता. कोव्हिड वार्डात रूग्णांशी ते संवाद साधत होते. समोर एका बेडवर वृद्ध महिला उपचार घेत होती. प्रकृतीने अगदी क्रीश, उपचारांनाही दाद देत नव्हती. जिल्हाधिकार्‍यांची नजर तिच्यावर गेली, रविंद्र जगतापांनी काही काळ स्तब्ध होवून तिच्याकडे पाहिले आणि पुढे चालू लागले. तेवढ्यात रूग्णालयातील कॉटखाली हलकिशी हालचाल झाली. जिल्हाधिकार्‍यांची नजर त्यया कॉटखाली गेली. सोबत असलेल्या डॉक्टरांकडे पाहत कोण आहे रे तिथे? हा प्रश्‍न उच्चारताच सोबतच्या पोलीसाने कॉटखाली हालचाल झालेल्या ठिकाणची चादर ओढली. दुसर्‍या क्षणी त्याखाली एक इसम दिसून आला.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter

जिल्हाधिकार्‍यांचा पारा वाढला. कोव्हिड वार्डामध्ये हा व्यक्ती येतोच कसा? असा प्रश्‍न उपस्थित डॉक्टरांना विचारला. त्या क्षणी त्या व्यक्तीने जिल्हाधिकार्‍यांचे पाय धरले आणि ऑक्सा बॉक्सा रडत तो म्हणू लागला, मला इथुन घालवू नका, मी माझ्या आईवर दुरवरून लक्ष ठेवतो. तिला मी इथे सोडून जावु कसा? ती जगणार नाही, मला माहित आहे पण जाता-जाता माझा मुलगा सोबत आहे हे समाधान तरी तिला घेवून जावु द्या साहेब! एका कॉटकडं बोट करत ती तिथं आहे माझी आई. मुलाच्या या बोलल्याने त्या वृद्ध माऊलीच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. तसे कलेक्टर काही न बोलता तेथून निघुन गेले. हृदयाला भिडणारी ही घटना बीड जिल्हा रूग्णालयातली आहे आणि ही हृदयद्रावक पोस्ट सोशल मिडियावर दस्तुरखुद्द बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या पत्नी सिमा जगताप यांनी टाकून कोरोनाची विदारक परिस्थिती अन् मायलेकरांची नाती दाखवून दिली.

कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवून सोडलाय. रोज बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होत आहे. ज्याला कोरोना झाला त्या व्यक्तीच्या जवळ कोणीही जात नाही. ना मुलगा ना मुलगी, आई ना बाप, बहिण ना भाऊ, पत्नी ना नवरा, ना नातेगोती सर्वकाही संपुष्टात असल्यागत जणु निसर्गाने आणि इश्‍वरानेच त्या व्यक्तीला वाळीत टाकलय. बहिष्करीत केलय अशी काहीसी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी माणसाला शिस्तीची गरज आहे. समुह संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतू येथे ना नियम पाळले जातात ना शिस्त असते. त्यामुळेच परिस्थिती अधिक बिकट होत चालली. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांंना अनेक अनुभव येतात. तो असाच एक अनुभव बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना काल परवा जिल्हा रूग्णालयात आला. मायलेकरांच्या त्या आतुट नात्याने जिल्हाधिकार्‍यांचा उर ही भरून आला असेल. त्यांच्या सोबत घडलेल्या घटनेचं शब्दांकन त्यांच्या सौभाग्यवती सिमा जगताप यांनी केलं आणि तेच शब्दांकन बीड जिल्हा रूग्णालयातील डॉ.सुधीर राऊत यांनी आपल्या अकाऊंटवरून फॉरवर्ड केलं. शब्दात मांडलेल्या मायलेकराच्या वात्सल्य ममता आणि प्रेमाचं मुर्तीमंत उदाहरण आणि कोरोना सारख्या महा भयंकर संकटाचं ते एक वास्तवच होतं. सिमा जगताप कोण? यावर रिपोर्टरने शोध घेत घेत थेट जिल्हाधिकार्‍यांनाच विचारलं असता, जिल्हाधिकार्‍यांनी होय त्या माझ्या पत्नी आहेत. मी कोव्हिड वार्डात जातो, लोकांचा माझा जास्त संपर्क असतो. म्हणून ती ही काळजीत असते. रोज फोन करून मी काय केले? सोशल डिस्टंस पाळला का? मास्क लावत होतो का? मी कसा आहे? याची माहिती घेते. हे सांगितल्या नंतर राजा असो की रंक, गरीब असो की श्रीमंत, शेतकरी असो की कष्टकरी, कर्मचारी असो की अधिकारी, वृद्ध असो की लहान कोरोना जात पाहिना ना पात पाहिना, लिंगभेद ही करीना. तो ज्याच्या शरिरात घुसतो त्याला आणि त्याच्या परिवारालाच तो किती अघोरी आहे हे लक्षात येतो. हेच या पोस्टवरून कळते. म्हणूनच सतर्क रहा, मास्क लावा, सोशल डिस्टंस पाळा.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


हीच ती सिमा जगतापांची पोस्ट,
डॉ.सुधीर राऊत यांनी केली होती शेअर

https://www.facebook.com/photo?fbid=462888204979512&set=a.110869533514716


काल परवा ची घटना जगताप साहेब बीड येथे कोव्हिड सेंटर ला भेट देण्यासाठी गेले होते. सोबत दोन ऑफिसर्स,पोलिस आणि तिथले मुख्य डॉक्टर्स होते. पी.पी. ई. किट घालून जीव किती बेजार होतो याचा अनुभव भयंकर होता.मनातल्या मनात डॉक्टरांना शतशः अभिवादन करून प्रत्येक बेड कडे नजर टाकत होते. पेशंटचे भयानक चिंताग्रस्त चेहरे पाहून पोटात गलबलून येत होते.अत्यंत जवळचे कुटुंबातील नातेवाईक जे या कोरोना ने कायमचे दुरावले त्यांची तीव्र आठवण येत होती.
एकीकडे अधिकाराचा मुकुट दुसरीकडे अत्यंत हळवे मन!सर्व अधिकार हाती असूनही सर्वांच्या वेदना कमी जास्त करण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे याची जाणीव झाली डोळ्यातले पाणी आत दामटत पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता काही तरुण काही वयस्कर सगळ्यांच्या चेहर्‍यावर एकच भीती मृत्यूची!दोष कोणाचा स्वतःचा की ज्याने नियम पाळले नाही त्याचा की नशिबाचा..त्यांचाच त्यांच्याशी चाललेला संघर्ष वेदनाजनक होता..आणि साहेब एका कॉट जवळ थबकले.सगळी एखाद्या बेडशीट च्या आत एक छोटी उशी असावी असे वाटले. ती व्यक्ती अत्यंत कृश व वयस्कर होती.कसलाच भाव नव्हता चेहर्‍यावर.जणू शेवटचा श्वास घेण्यासाठी आतुर होती.चेहर्‍यावर थंड समाधान.त्याने साहेबांच्या मनात गूढ आश्चर्य निर्माण केले.ते तसेच पुढे सरकले आणि जागेवर थांबले दूरच्या कोपर्‍यात टेबल खाली काही संशयास्पद हालचाल दिसली.तसे त्यांनी डॉक्टर कडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि विचारले त्या टेबल खाली कोण आहे? काय प्रकार आहे. डोक्यावर पांढरी बेडशीट ओढून कोणीतरी शरीराचा खुडमुदा करून तिथे बसले होते.झटकन पोलिस शिपाई पुढे झाले त्या व्यक्तीला बाहेर खेचले.डॉक्टरांनी र्पीीीश कडे पाहिले दरडावून विचारले,इथे बाहेरची व्यक्ती आलीच कशी?तुमचे लक्ष नाही का?तेव्हड्यात ती व्यक्ती अक्षरशः जगताप साहेबांच्या पायावर कोसळली आणि ऑक्सोबॉक्सी रडू लागली.त्याने सांगितले साहेब,मला इथून घालवू नका मी माझ्या आईवर दुरून लक्ष ठेवत आहे.तिला मी इथे सोडून जावू कसा.ती जगणार नाही मला माहिती आहे पण जाताजाता माझा मुलगा सोबत होता हे समाधान तरी तिला घेवुन जावू द्या साहेब…असे म्हणून त्याने आईच्या कॉट कडे बोट दाखवीत म्हणाला साहेब तीच माझी आई जिच्या कॉट जवळ ज्यास्त वेळ थांबला होता.आता मात्र त्या माऊलीच्या चेहरयावर दिसणार्‍या समाधानाचा साहेबाना पूर्ण उलगडा झाला…साहेब पुढे निघून केले मनात र्वीींू षळीीीं..म्हणत.
-सीमा जगताप

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....