Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमलाईट जाताच पिंपळनेरचे बीएसएनएल टॉवर पडते बंद संपर्क होत नसल्याने ग्राहक वैतागले

लाईट जाताच पिंपळनेरचे बीएसएनएल टॉवर पडते बंद संपर्क होत नसल्याने ग्राहक वैतागले


बीड (रिपोर्टर): बीएसएनएल कार्यालयाच्या कुठल्या ना कुठल्या नेहमीच तक्रारी असतात. सदरील तक्रारी वेळेत दुरूस्त केल्या जात नाहीत. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. पिंपळनेर येथे बीएसएनएलने टॉवर उभे केले खरे मात्र लाईट नसल्यावर येथील टॉवर पुर्णत: बंद पडते. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांचा एकमेकांशी संपर्क होत नाही. टॉवर मधील बॅटर्‍या नादुरूस्त असल्याने लाईट गेल्यानंतर त्या चालत नाहीत. बीएसएनएलचे टॉवर व्यवस्थित सुरू होण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालून ग्राहकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


पिंपळनेर परिसरामध्ये बीएसएनएलचे ग्राहक मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी भव्यदिव्य टॉवर उभारण्यात आले मात्र हे टॉवर लाईट गेल्यानंतर पुर्णत: बंद पडते. लाईट गेल्यानंतर बॅटरीमुळे यंत्रणा सुरू होवू शकते मात्र बॅटर्‍या नादुरूस्त असल्याने टॉवर बंद पडत आहे. टॉवर बंद पडल्यावर ग्राहकांचा संपर्क होत नाही. आपले टॉवर दुरूस्त करण्यासाठी बीएसएनएल कार्यालयाकडून कुठलीही ठोस पाऊले उचलले जात नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून टॉवर तात्काळ दुरूस्त करावे आणि पिंपळनेर परिसरातील ग्राहकांची गैरसोय टाळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!