बीड (रिपोर्टर):- विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळुची वाहतूक करणारा हायवा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने पिंपळनेर -घाटसावळी रस्त्यावर रात्री पकडला असून हायवा चालक राजाभाऊ सुभाष मुंडे याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. काल अवैध वाळू घेऊन जाणारा हायवा (क्र. एम.एच. १६ ए.ई. ५५२३) हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पिंपळनेर रोडवरून ताब्यात घेत पिंपळनेर पोलीस ठाण्यात आणून हायवा चालक राजाभाऊ मुंडे (रा. ताडसोन्ना ता. बीड) याच्या विरोधात अवैध वाळू उपसा व वाहतूक कलम ३७९, १०९ सह कलम १३०/१७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना.बी.आर.सुरवसे हे करत आहेत.