Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमराजपिंप्रीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

राजपिंप्रीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


गेवराई (रिपोर्टर):- तालुक्यातील राजपिंप्री येथील एका २१ वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळविण्यात आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


आनंता तुकाराम माने (वय २१) या तरुणाचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या तरुणाने रात्री आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय. घटनेची माहिती गेवराई पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तरुणाने नेमकी आत्महत्या कशामुळे केली हे मात्र समजू शकले नाही.

Most Popular

error: Content is protected !!