उड्डानपुलाच्या मागणीसाठी नागरिक
रस्त्यावर, हायवेवर आंदोलन
दुपारी दीड वाजेपयर्ंत मृतदेह घटनास्थळीच; पोलीसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे, आज दुपारी बागपिंपळगाव फाट्याजवळ घडली घटना
गेवराई (रिपोर्टर):- भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी बागपिंपळगाव फाटा येथे घडली. रस्ता ओलांडत असतांना या परिसरामध्ये आतापर्यंत अनेकवेळा अपघात होवून कित्येकांचे बळी गेले. हायवे रस्ता तयार करतांना दोन्ही बाजुने उड्डाणपुल करणे गरजेचे होते. मात्र संबंधित विभागाने उड्डानपुल केले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले. आजचा अपघात घडल्यानंतर बागपिंपळगावचे लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घटनास्थळी रस्तारोको आंदोलन केले. मृतदेह दुपारी दीड वाजेपर्यंत घटनास्थळीच पडून होता. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर लोकांनी आंदोलन मागे घेतले.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
शिवाजी फुलारे आणि बाबासाहेब मुगुटवार हे दोघे जण मोटरसायकलवरून बागपिंपळगावकडे जात होते. बागपिंपळगाव फाट्याजवळ त्यांच्या मोटर सायकलला ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात शिवाजी फुलारे (वय ३६) हे जागीच ठार झाले. तर बाळसाहेब मुगुटराव (वय ३८) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. बाग पिंपळगाव फाटा आणि कॅप्टन पेट्रोलपंपसमोर सातत्याने अपघात होत आहेत. याठिकाणी उड्डानपुल नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले. हायवे रस्ता तयार करत असतांना दोन्ही ठिकाणी उड्डानपुल करणे गरजेचे असतांना संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले. आजचा अपघात झाल्यानंतर बागपिंपळगाव येथील नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी घटनास्थळी आंदोलन केले, दुपारी दीड वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळीच होता. लोकांचा संबंधित विभागाविरोधात तिव्र संताप होता. दरम्यान घटनेची माहिती गेवराई पोलीसांना झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी धाव घेत या प्रकरणी मध्यस्थी केली व त्यानंतर लोकांनी रस्ता खुला केला होता.