Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडमाहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

बीडमधील कार्यकाळ उल्लेखनीय राहिलाबीडमधील कार्यकाळ उल्लेखनीय राहिला
पुणे (रिपोर्टर):- जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग (वय ५४) यांचे शनिवारी पहाटे उपचारा दरम्यान ससून रुग्णालयात दु:खद निधन झाले. गेल्या रविवारी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ससू रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सरग हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी एका दैनिकात पत्रकारितेला सुरुवात केली होती.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter

त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली होती. गेल्या चार वर्षांपासून ते पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्यरत होते. बीड येथेही जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. पत्रकारिता क्षेत्रात लोकप्रिय होते. येत्या आठवड्यात त्यांचे प्रमोशन होणार असल्याचे त्यांना मुंबई मंत्रालयातून सांगण्यात आले होते. राजेंद्र सरग यांनी नवीन-जुना, लहान-मोठा पत्रकार असा कधीच भेदभाव केला नाही. प्रत्येकास ते सहकार्य करायचे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सरग कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!