Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना लोकाहो, कोरोनाची लस सुरक्षित नोंदणी करा, तात्काळ लस घ्या

लोकाहो, कोरोनाची लस सुरक्षित नोंदणी करा, तात्काळ लस घ्या


जिल्ह्यात केवळ लाखभर लोकांनी घेतली कोरोनाची लस
बीड (रिपोर्टर):- गेल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना लसीचे लसीकरण सुरू असून १५ लाखांपेक्षा जास्त लोकांना जिल्ह्यात ज्या लसीची गरज आहे. त्यात केवळ आतापर्यंत ९३ हजाराच्या आसपास लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे आजमितीला ४२ हजार लस उपलब्ध आहेत. आणखी १ लाख लसीच्या डोसची मागणी केली आहे परंतु लोक लस घेण्याबाबत उदासिन दिसून येत आहेत. लस सुरक्षित आहे, नोंदणी करा आणि तात्काळ लस घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter

जेष्ठ नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी खालील संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोदवावे. https://selfregistration.cowin.gov.in/

बीड जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाखांपेक्षा जास्त असून १८ वर्षांवरील संख्या ही १५ ते १६ लाकांच्या घरात आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असून बाधितांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल तेवढ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका कमी होईल. बीड जिल्ह्यात गेल्या चाळीस दिवसांपासून कोरोनाचे लसीकरण सुरू असून आतापर्यंत ९७ हजार ६८५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. लसीकरणाचा हा वेग अत्यंत कमी आहे. ४० दिवसांच्या कालखंडामध्ये किमान ३ लाखांच्या आसपास जिल्ह्यात लसीकरण व्हायला हवे होते मात्र लोक लस घेण्याबाबत उदासिनता दाखवत आहेत. लसीला घाबरत आहेत. परंतु लस सुरक्षित असून आजपर्यंत ज्या ९७ हार ६८५ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आणि ज्या १३ हजार ५३६ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला त्यांना विशेष असे कुठलेही साईड इफेक्ट दिसून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ११ हजार २२१ लस देण्यात आल्या असून ४२ हजारंच्या आसपास आजही आरोग्य विभागाकडे लस उपलब्ध आहेत. त्यापुढे जात एक लाख लसीची त्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. जिल्ह्याच्या ११६ ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून १३ ठिखाणी खासगी लसीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहेत.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...