Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना चिंताजनक, २४ तासात ९ जणांचा मृत्यू

चिंताजनक, २४ तासात ९ जणांचा मृत्यू


बीड, माजलगाव, अंबाजोगाई तालुक्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू
बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. ज्या प्रमाणे कोरोनाचे रूग्ण वाढू लागले त्याचप्रमाणे मृत्यूही वाढु लागले. बीड जिल्ह्यात दररोज ४०० पर्यंत नवीन कोरोना रूग्ण आढळून येवू लागले. गेल्या २४ तासात नऊ जणांचा मृत्यू झाला. हे नऊ मयत बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यावर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू होते.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या कोरोना रूग्णामुळे आरोग्य प्रशासनावर याचा मोठा ताण पडु लागला. बीड जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉकडाऊन केले असले तरी रूग्ण संख्या मात्र कमी झाली नाही. चारशे पर्यंत रूग्ण सापडू लागले. कोरोना बाबतचे नियम कडक पाळण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचे असले तरी अनेक नागरिक नियम पाळीत नसल्याचे दिसून आले आहे. गर्दी टाळावी, मास्क वापरावे अशा सक्तीच्या सूचना जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या आहेत. मात्र बहुतांश नागरिक आजही मास्कचा वापर न करता प्रवास करत आहेत. ज्या प्रमाणे कोरोना रूग्णांची संख्या वाढु लागली त्याच प्रमाणे मृत्यूचा दरही वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासात जिल्हाभरामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला.

मयत कुठले?
माजलगाव मयत २ एकाचे वय ७० तर दुसर्‍याचे वय ७५ परळी १ वय ८० वर्षे, बीड २ वय ६५, ७५ वर्षे, अंबाजोगाई २ वय ६३, ७७ वर्षे, केज २ वय ४३, ६३ वर्षे

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....