Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाराज्य शासन लॉकडाऊनच्या मुडमध्ये दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली

राज्य शासन लॉकडाऊनच्या मुडमध्ये दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली


मुंबई (रिपोर्टर):- सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जिंदगी जान आणि पुन्हा काम’ असं वक्तव्य करत कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार, असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने राज्य शासन लॉकडाऊनच्या मुडमध्ये असून आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावली आहे त्यामुळे आज लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

https://t.me/beedreporter


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. लॉकडाऊन हा उपाय नाही, पण दृश्य स्वरुपात बदल दिसत नाहीत आणि काही वेळा उपाय मिळाला नाही तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. वृत्तपत्राच्या संपादकांसोबत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत त्यांनी दिले. अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे. यावर मी बोलणार नाही, मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असे पुन्हा एकदा सांगितले. लोक ऐकत नाहीत, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत चालला आहे. अशा स्थितीत राज्यात लॉकडाऊन करायचे की नाही यावर गेल्या दोन दिवसांपासून चर्चा खलबते सुरू आहे. अनेकांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठकाही घेतल्या आहेत. आता मात्र लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे सचिवांकडून सांगण्यात येऊ लागल्याने राज्य शासन लॉकडाऊनच्या मुडमध्ये आले आहे. दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक बोलावली असून या बैठकीनंतर मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!