मतदान शांततेत पार पाडण्यासाठी 455 पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त
आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील 109 ग्रामपंचायत पैकी 4 गावे बिनविरोध झाली असून 105 ग्रामपंचायतींसाठी उद्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी आष्टी तालुका प्रशासन सज्ज असून मतदान केंद्रावर उमेदवार कोणताही अनुचीत प्रकार न घडण्याची काळाजी घेतली जात आहे. यासाठी मोठा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 356 मतदान केंद्रावर प्रक्रिया पार पडणार असून 1 लाख 77 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.
तालुक्यातील 105 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून उद्या रविवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सेट केले असून आज 17 डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावरती अधिकारी कर्मचारी व मतदान यंत्र बसद्वारे सायंकाळी पोहोच होतील प्रत्येक मतदान केंद्रावरची व्यवस्था करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नेमलेले असून केंद्र अध्यक्ष 392, मत अधिकारी क्र 1 392,मत अधिकारी क्र 392, मत अधिकारी क्र 3 392, झोनल अधिकारी 31 तहसिलदार कर्मचारी 120 ते140, निवडणूक निर्णय अधिकारी 40, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 40 असे एकूण 1568 अधिकारी कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.तालुक्यातील 105 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी 298 तर 1 हजार 966 सदस्यांसाठी उमेदवार उभे आहेत. एकुण 356 मतदान केंद्रावर प्रक्रिया पार पडत आहे.1 लाख 77 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
20 डिसेंबरला मतमोजणी
सर्व ग्रामपंचायतींच्या मतदानाची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी आयटी आय कॉलेज येथे पार पडणार असून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी सांगितले.
आष्टी त पोलिसांचा तगडा बंदोबस्त 30 पोलिस अधिकारी डठझऋ च्या टीमला केले पाचारण
मतदान केंद्रावर उमेदवार अथवा अन्य कोणी व्यक्ती वारंवार फिरता येणार नाही, याचा काळजी घेतली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत कोणी बाधा आणल्यास गय केली जाणार नाही. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.30 पोलिस अधिकारी,पोलिस कर्मचारी 400 व एस आरपीएफ अधिकारी 25 कर्मचारी असलेल्या तुकडीला पाचारण करण्यात आले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी दिली आहे.