Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम कुक्कडगाव परिसरात चोट्यांचा धुमाकूळ

कुक्कडगाव परिसरात चोट्यांचा धुमाकूळ

8 विद्युत मोटारी, 5 स्टार्टर, चारशेफूट वायरची चोरी
कुक्कडगाव (रिपोर्टर):- कुक्कडगाव परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत सिंदफणा नदीवरील बंधार्‍यावर असलेल्या 8 मोटारी, 5 स्टार्टर आणि 400 फुट वायर चोरून नेले. एकाच रात्री आठ मोटारी चोरून नेल्याने शेतकर्‍यात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter


यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के तलाव पुर्णत: भरली होती. सध्या उन्हाळी हंगाम सुरू अस्याने शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देण्यासाठी तलावांवर, बंधार्‍यांवर मोटारी बसविल्या. चोरटे विद्युत मोटारींची चोरी करत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. सिंदफणा बंधार्‍यावर अनेक शेतकर्‍यांच्या मोटारी असल्याने रात्री संधीचा साधून अज्ञात चोरट्यांनी 8 मोटारी, पाच स्टार्टर आणि 400 फुट वायर चोरून नेले. या चोरीच्या घटनेने कुक्कडगाव परिसरातील शतेकर्‍यात खळबळ उडाली आहे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...