Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकल्यास 500 रु. दंड जमावबंदीचे उल्लंघन केल्यास 1000...

मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकल्यास 500 रु. दंड जमावबंदीचे उल्लंघन केल्यास 1000 रुपये भरा


बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा समुहसंसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने मिनी लॉकडाऊनची घोषणा करत कडक निर्बंध लाले असून बीड जिल्हा प्रशासनानेही हे निर्बंध अधिक करण्या हेतू दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्यास हजार रुपये दंड, मास्क न वापरल्यास 500 रुपये, रस्त्यावर थुंकल्यास 500 रुपये, मास्क नसलेल्या ग्राहकास चहा देणार्‍या हॉटेल चालकास 500 रुपये, विना मास्क कार्यालयात प्रवेश करू देणार्‍या संबंधित कार्यालयीन अधीक्षकास 1000 रुपये दंड आकारण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter

ias rajendr jagtap beed


4 तारखेपर्यंतचं संपुर्ण लॉकडाऊन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी मागे घेऊन राज्य शासनाच्या गाईड लाईननुसार मिनी लॉकडाऊन काल रात्री उशिरा घोषीत केले. कोरोनाचा समुहसंसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंधावर भर देत शासनाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. पाचपेक्षा अधिक लोक एका ठिकाणी आढळल्यास जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून संबंधितांवर हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. शहरामध्ये विनामास्क फिरणार्‍या व्यक्तीला पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यावर पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकलेले आढळून आल्यास संबंधितांवर पाचशे रुपये दंड आकारण्यात येऊ शकतो. मोठ्या हॉटेलांना केवळ पार्सलची सुविधा ठेवण्यात आली आहे तर छोट्या चहाच्या टपर्‍या, हॉटेल यांना सहा फुटांचे अंतर राखून मास्क असलेल्या ग्राहकांना चहा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुचनांचे पालन न केल्यास आणि विनामास्क हॉटेलसमोर चहा पिताना व्यक्ती आढळून आल्यास संबंधित चहा विक्रेत्यावर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, उद्योग, कंपन्यांमध्ये प्रवेशद्वारावर ‘नो मास्क नो इन्ट्री’चा फलक लावणे बंधनकारक असून विना मास्क संबंधित कार्यालयामध्ये एखादा व्यक्ती आढळून आल्यास त्या कार्यालयाच्या, संस्थेच्या अथवा कंपनीच्या अधीक्षकास जबाबदार धरून त्याच्यावर हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

https://t.me/beedreporter

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....