Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना मोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश

मोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश

बीड – ऑनलाईन रिपोर्टर

राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन बाबत आदेश काडले असून शनिवार रविवार दवाखाना, मेडिकल व अन्य अत्यावश्यक सेवा वगळता काडेकोड बंद तर सोमवार ते शुक्रवार किराणा दुकान, भाजीपाला दुकान, दुध डेअरी, बेकरी, मिठाई चे दुकान, शेती संबंधीत सेवा, रुग्णालय, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, आरोग्याशी संबंधीत सर्व सेवा सुरु राहणार आहेत. माध्यमांची कार्यालये देखील सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली

जिल्हाधिकारी म्हणाले, हे माझे नाही राज्य शासनाचे आदेश
 


कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनच इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यावर राज्यब्रातुन विरोध होऊ लागल्यानंतर लॉकडाऊन नव्हे तर कठोर निर्बंध अशी भूमिका रविवारी सरकारने घेतली होती. मात्र आता हे कठोर निर्बंध म्हणजे एका अर्थाने लॉकडाऊनच असल्याचे चित्र राज्य सरकारचे निर्देश समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. 30 एप्रिलपर्यंत राज्यात केवळ अत्यावश्यक सुविधाच सुरु राहणार आहेत. इतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश राज्यसरकारने काढले आहेत. त्यानूसार सर्व जिल्ह्यात ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांनी तसे आदेश काढले आहेत.
 
काय राहणार सुरु
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायं.8 या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला दुकान, दुध डेअरी, बेकरी, मिठाई चे दुकान, शेती संबंधीत सेवा, रुग्णालय, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, आरोग्याशी संबंधीत सर्व सेवा सुरु राहणार आहेत. माध्यमांची कार्यालये देखील सुरु राहणार आहेत.
 
वाहतूक व्यवस्था मात्र सुरु
या काळात राज्यातील सर्व प्रकारची खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहेत. यात अ‍ॅटो रिक्षात चालकासह दोन प्रवाश्यांना परवानगी असेल तर चार चाकी वाहनात चालक आणि वाहनाच्या प्रवाशी क्षमतेच्या निम्म्या प्रवाश्यांना प्रवास करता येईल. बसमध्ये केवळ सीटवर बसूनच प्रवास करता येईल. 
 
कार्यालयांचे काय
बँका, महावितरण, दूरसंचारसेवा, विमा आणि मेडिक्लेम, पाणी पुरवठा ही कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहतील. 
 
हॉटेलचे काय
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरु राहिल. शनिवार रविवार या दिवशी हॉटेलमधून परवानाधारक कर्मचार्‍यांमार्फत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित कर्मचार्‍याकडे कोरोना चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक राहणार आहे. लॉजींगची सुविधा असलेल्या हॉटेलबाबतीत रेस्टॉरंट आणि बार केवळ हॉटेलमधील प्रवाश्यांसाठीच सुरु असतील. त्या व्यतिरीक्त बार, वाईनशॉप, हॉटेल बंद राहणार आहेत.
 
आणखी काय बंद
सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, बागा, सार्वजनिक ठिकाणे पूर्णत: बंद राहणार आहेत. सर्व शाळा आणि महाविद्यालये देखील बंद राहणार असून खाजगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहेत. 10 वी 12 वीच्या परिक्षा मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा व्यवस्थीत देता येईल. 
 
बांधकामाचे काय होणार
ज्या ठिकाणी मजूरांना बांधकामावरच राहण्याची सोय असेल अशा ठिकाणची बांधकामे सुरु राहतील. मात्र कुठल्याही परिस्थितीत बांधकामासाठी मजूरांची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहतूक करता येणार नाही. 

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....