Tuesday, December 1, 2020
No menu items!
Home देश विदेश PUBG गेम भारतात पुन्हा सुरु होणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

PUBG गेम भारतात पुन्हा सुरु होणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

मुंबई : तरुणांमध्ये क्रेझ बनलेल्या PUBG मोबाइल गेमला सायबर सुरक्षेच्या कारणास्तव भारतात बंदी घालण्यात आलीआहे. मात्र PUBG गेम पुन्हा भारतात सुरु होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, PUBG मोबाइलची मूळ दक्षिण कोरियाची कंपनी गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी चर्चा करत आहे.

केंद्र सरकारचा यूजर डेटा देशाबाहेर स्टोअर होत असल्याची चिंता व्यक्त करत ही कंपनी भारतातील यूजर्सचा डेटा भारतातच स्टोअर करण्याबाबत भागिदारांशी बोलत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमिंग कंपनीने देशातील काही हाय-प्रोफाइल स्ट्रीमर्सना खासगी माहिती दिली आहे की या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात पुन्हा PUBG सुरू होईल अशी आशा आहे.

या आठवड्यात कंपनी आपल्या भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल घोषणा करू शकते. दिवाळीच्या दरम्यान पुढील आठवड्यात कंपनी मार्केटिंग मोहिम राबवण्याचीही योजना आखत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, PUBG ने सॉफ्टबँक समर्थित पेटीएम आणि टेलिकॉम कंनी एअरटेलसह अनेक स्थानिक कंपन्यांशी चर्चा केली आहे. जेणेकरून त्यांना देशात लोकप्रिय मोबाइल गेम पब्लिश करण्यात रस आहे की नाही याचा अंदाज घेता येईल. मात्र, पेटीएमने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

चिनी कंपनी Tencent ने भारतात PUBG ची सुरुवात केली होती. बंदीपूर्वी PUBG मोबाइलची सामग्रीला Tencent क्लाऊडवर होस्ट केलं होतं. भारतात 5 कोटींहून अधिक मासिक सक्रिय यूजर्ससह बंदी घालण्यापूर्वी PUBG गेम सर्वात लोकप्रिय मोबाइल गेम होता. मात्र PUBG ची वापसी इतर गेम डेव्हलपर्ससाठी डोकेदुखी ठरू शकते, जे अशा प्रकारचा गेम डेव्हलप करण्याच्या तयारीत आहेत. 2 सप्टेंबर रोजी भारत सरकारने PUBG सह 118 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली. डेटा सुरक्षेसाठी या सर्व अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.

Most Popular

पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी जोगेश्वरी पारगांव येथील महिला ठार

पांगुळगव्हाण येथील शेतकरी प्रसंगसावधनाने हल्ल्यात बचावले नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम तात्काळ जेरबंद करण्याची मागणी

बिबट्याला पकडण्यासाठी ताडोबा जंगलातले एक्सपर्ट आष्टीत

बिबट्या पाथर्डी परिसरातून आला, सकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरूआष्टी/बीड (रिपोर्टर)- नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तिघा जणांचा बळी घेतल्याने आष्टीसह पाटोदा आणि शिरूर तालुक्यात एकच...

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण करणार विजयाची हॅट्रीक

सुजान पदवीधर मतदारांची सतिष चव्हाणांनाच सर्वत्र साथगेवराई (रिपोर्टर)-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदिरा कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच इतर मित्रपक्षांच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण विजयाची...