Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना शासन-प्रशासनपुढे लोकांचा जीव वाचवणे एवढाच ध्येय -जगताप

शासन-प्रशासनपुढे लोकांचा जीव वाचवणे एवढाच ध्येय -जगताप

लोकाहो, सहकार्य करा, घरातच रहा


तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी लोकांच्या सेवेत
बीड जिल्हा प्रशासनाने जो काही निर्बंधाबाबतचा निर्णय रात्री जाहीर केला आहे तो संपुर्ण निर्णय हा राज्य शासनाचा आहे. जिल्हावासियांना माझी हात जोडून विनंती आहे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, शासन आणि प्रशासनाला लोकांचे जीव वाचवणे हे महत्वाचे आहे. आमचे ध्येय तेवढेच असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी रिपोर्टरला सांगितले.


   बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सदृश्य निर्बंध गरजेचे आहेत. जिल्ह्यातील व्यापार्‍यांसह नागरिकांनी ही बाब गंभीरतेने समजून घ्यावी. रात्री जिल्ह्यातील बहुतांशी व्यापार्‍यांसोबत आपली चर्चा झाली असून त्यांनी प्रशासनाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे, असं सांगत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील जनतेला हात जोडून विनंती केली आहे. शासन आणि प्रशासनाला लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. जीव असतील तर सर्व काही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व वर्गातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्व काही उपलब्ध करू शकतो, परंतु वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर हे उपलब्द करू शकत नाहीत. त्यात आज अनेक औषधांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखणं नितांत गरजेचं असल्याने नागरिकांनी घरात राहून कोरोनाची लढाई लढावी, असे आवाहन या वेळी जगताप यांनी केली.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...