बीड (रिपोर्टर):- दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांकडून जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील उपायोजना जाणून घेतल्या.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter
बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रेमिडिसीव्हर इंजेक्शनचा साठा किती आहे, 30 एप्रिलपर्यंत किती इंजेक्शन लागतील, रुग्णांच्या संख्येत किती वाढ होऊ शकते, उपलब्द असलेला ऑक्सीजन साठा, कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून होणारे प्रयत्न, प्रशासनाच्या अडचणी याबाबत बीड जिल्ह्याचा सविस्तर आढावा संजयकुमार यांनी घेऊन आवश्यक त्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीला जिल्हाधिकार्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार सह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.