बीड (रिपोर्टर):- स्वामी नरसिंगानंद यांनी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले असून त्यांच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीची तक्रार घेऊन जाणार्या फिर्यादींनाच पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी अरेरावीची भाषा वापरत तुमच्या विरोधातच मी 353 चा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डीवायएसपी यांच्याकडे करण्यात आली.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter
गेल्या काही दिवसांपुर्वी स्वामी नरसिंगानंद यांनी धार्मिक भावना दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केले. या बाबत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते स्वामीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार घेऊन गेले होते. मात्र या कार्यकर्त्यांची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी त्यांनाच अरेरावीची भाषा वापरत तुमच्यावरच 353 चा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत संबंधितांना हाकलून लावले. याबाबत पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी डीवायएसपींच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी शेख वसीम, असीम फारुकी, मोमीन मुसब्बीर, मोमीन फेरोज, अहमद खान यांनी केली आहे.