किल्ले धारूर(रिपोर्टर): धारूर शहरांमध्ये आज नगरपरिषद कर्मचारी यांनी शहरात मास्क न वापरता मोकाट फिरणार्या नागरिकांकडून 12000 रु दंड वसूल केला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये लॉक डाऊन सुरू आहे या लॉक डाऊन मध्ये बीड जिल्हाधिकारी यांनी नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार जे नागरिक लॉक डाऊन चे पालन करत नसतील अशा नागरिकांकडून स्थानिक नगरपरिषद कर्मचारी दंड वसूल करत आहेत आज शिवाजी चौक, मेन रोड तसेच रहदारीच्या ठिकाणी स्वतः नगरपरिषद कर्मचार्यांनी जाऊन जे नागरिक मास्क लावत नव्हते.
अशा नागरिकांना मास्क न लावल्यामुळे प्रति 500 रु दंड केला आहे असे एकूण 12 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे नोडल ऑफिसर सचिन डावकर यांनी सांगितले आहे. यावेळी नगरपरिषदेचे नोडल ऑफिसर सचिन डावकर ,माणिक लोखंडे , फुन्ने मॅडम, जयराज गायसमुद्रे यांच्यासह पोलिस निरीक्षक सुरेखा धस व पोलीस कर्मचारीही उपस्थित होते सर्वांनी लॉक डाऊनचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.