Sunday, April 18, 2021
No menu items!
Home Uncategorized कडब्याच्या चालत्या ट्रॅक्टरला आग; सहाशे कडबा जळून खाक

कडब्याच्या चालत्या ट्रॅक्टरला आग; सहाशे कडबा जळून खाक


विजेच्या तारेमुळे लागली आग
बीड (रिपोर्टर):- कडबा घेऊन चाललेल्या चालत्या ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र सदरील आग विझवण्यात अपयश आले. या आगीत शेतकर्‍यांचा सहाशे कडबा जळून खाक झाला. ही घटना आज कुक्कडगाव येथे घडली.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter


रमेश शिंदे हे आपल्या शेतातील कडबा एका ट्रॅक्टरद्वारे घेऊन येत होते. रस्त्यामध्ये विजेच्या तारा खाली लोंबलेल्या होत्या. या तारेचे घर्षण झाल्याने त्याच्या ठिणग्या कडब्यावर पडल्या आणि यामध्ये कडब्याने पेट घेतला. कडबा विझवण्याचा प्रयत्न करण्यात आले मात्र यात यश आले नाही. यात शिंदे यांचा सहाशे कडबा जळून खाक झाला.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....