Monday, April 19, 2021
No menu items!
Home महाराष्ट्र मुंबई परिस्थिती गंभीर; महाराष्ट्राची जनता सरकारच्या पाठिशी उभा राहील -पवार

परिस्थिती गंभीर; महाराष्ट्राची जनता सरकारच्या पाठिशी उभा राहील -पवार


मुंबई (रिपोर्टर):- करोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधासंदर्भात बोलताना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रामध्ये पाच एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांवरुन दुकानदार, व्यापारी आणि राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला असून या कठीण प्रसंगामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनता सरकारच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


नव्या निर्बंधांसंदर्भात दुकानदार, व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख पवारांनी केला. तसेच नाशवंत भाजीपाल्याचं काय करायचं असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारी वर्गापुढे आहे याचीही जाणीव आपल्याला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. मात्र सध्या घेतलेला निर्णय आणि निवडलेला मार्ग हा यशाचा मार्ग करायचा असेल तर या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उपलब्ध राहिलेला नाही, असं पवार म्हणाले. वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही याची जाणीव सामाजातील सर्व घटकांनी ठेवणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून जनतेच्या हितासाठी नाइलाजास्तव काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागले आहेत, असं पवारांनी स्पष्ट केलं. मागील वर्षी आपण करोनाला उत्तम प्रकारे तोंड दिला. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत आताची संख्या पाहिल्यास सध्याच्या वाढीचा वेग अत्यंत चिंताजनक आहे, असं शरद पवारांनी म्हटलं.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...