Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड सुळेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, नागझरी, आडुळ घाट, गव्हाणथडी वाळु घाटांवर अवैध उपसा आ.संदीप...

सुळेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, नागझरी, आडुळ घाट, गव्हाणथडी वाळु घाटांवर अवैध उपसा आ.संदीप क्षीरसागरांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

एकाच इनव्हाईसवर एकच ट्रक भरते अनेक वेळा वाळु
शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जातो
महसूल, पोलीस, आरटीओंचे संगनमत; आमदाराचा गंभीर आरोप
तातडीने कारवाई करा, लेखी स्वरुपात माहिती द्या
बीड (रिपोर्टर):- वाळु लिलाव घाटाची ठरवून दिलेली जागा सोडून इतरत्र ठिकाणी शासनाला कसल्याही प्रकारचा महसूल न भरता जिल्ह्यातील सुळेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, नागझरी ता. गेवराई आडुळ घाट,गव्हाणथडी, ता. माजलगाव येथून सर्रास अवैध वाळु उपसा होत असून तो उपसा तात्काळ थांबवावा आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे केली आहे. या अवैध वाळु उपश्यामुळे या भागातल्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था होत असल्याचे त्यांनी म्हटले.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


बीड जिल्ह्यातील सुळेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, नागझरी, आडुळघाट, गव्हाणथडी या ठिकाणचा लिलाव होऊन वाळु उपश्याचे घाट सुरू करण्यात आले आहेत. मात्र या वाळु घाटाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. एकच इनव्हाईसवर दिवसभरामध्ये एकच ट्रक अनेकदा वाळु भरून घेतले. कोल्हापूर, उस्मानाबाद येथे वाळु खाली करण्याचे इन्व्हाईसद्वारे बीड जिल्ह्यात वाळु खाली करते. सदर ट्रक टिप्परमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वाळु भरून अवैधरित्या वाळुची वाहतूक केली जाते. याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे. वाळु लिलाव घाटाची ठरवून दिलेली जागा सोडून इतरत्र ठिकाणी शासनाला कसल्याही प्रकारचा महसूल न भरता अवैधरित्या वाळुचा उपसा रात्री के्रनच्या साहाय्याने सर्रासपणे सुरू आहे. या अवैध वाळु उपश्याच्या वाहतुकीमुळे रस्तेही मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत. या अवैध वाळु वाहतुकीच्या प्रकाराला महसूल, पोलीस, आरटीओ विभागाचे संपुर्ण दुर्लक्ष असून त्यांच्या संगनमताने अवैध वाळु वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, असं म्हणत आ. क्षीरसागरांनी या अगोदर जिल्हाधिकार्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे याची माहिती दिल्याचे म्हटले आहे. माहिती देऊनही हा अवैध वाळु उपसा अद्याप थांबलेला नाही. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सदरचा प्रकार तात्काळ थांबवून दोषींवर तातडीने कारवाई करावी, व त्याची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, अशा आशयाचे पत्र आ.क्षीरसागरांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना दिले आहे.

कोविडच्या निमित्ताआड वाळु तस्करीकडे दुर्लक्ष करू नका
कोरोनाचे निमित्त पुढे करत सर्रासपणे वाळु तस्करांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वाळुचे ठेके ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीही अवैपणे वाळु उपसा होत आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कोविडच्या निमित्ताआड या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करू नये, असे जनतेतून सातत्याने सांगण्यात आले होते मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...