Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम राखीव वनक्षेत्रात अग्नि तांडव!

राखीव वनक्षेत्रात अग्नि तांडव!

बीड-नगरच्या सिमेवर वारणी शिवारातील प्रकार ; नागरीकांच्या प्रसंगवधानामुळे अनर्थ टळला

शिरूर – बीड-नगर सिमेवरील वारणी (ता शिरूर का.) शिवारात मंगळवारी ( दि.६ ) नगर हद्दीतील राखिव वन क्षेत्राजवळ अचनक आग लागली . ऐन दुपारच्या वेळेत या आगीने नगर हद्दीतील राखिव वनक्षेत्रात शिरकाव केला. शेतातील गुराख्यांनी तात्काळ इतर नागरिकांसह नगर वनविभागास पाचारण केल्याने रात्री ऊशिरापर्यंत आग विझविण्यास यश आल्याने दहिवंडी शिवारातील राखिव वनक्षेत्राची हानी टळली वारणी शिवारातील नगर हद्दीत असलेल्या दाखिल वनक्षेत्रापासून हाकेच्या अंतराल खांसी क्षेत्रात मंगळवारी अचानक आग लागली. नगर -बीड त्याग सिमेवरील बीड हद्दीतील दहिवंडी शिवारातील राखिव वन क्षेत्रास लागून नगर हद्दीच्या वनक्षेत्रात आगीचा शिरकाव झाल्याने पद्मश्री पुत्र यूसूफ सय्यद, मुन्ना सय्यद यानी तत्काळ कासवाडी(ता पाथर्डी) येथिल नागरीकांसह पाथर्डी वनपरिक्षेत्राच्या‌ वनरक्षक वर्षा गिते यांना माहिती दिली. त्याचबरोबर दहिवंडी शिवारातील राखिव वनक्षेत्रात आगिचा शिरकाव ‌ होण्याचा अंदाज घेत पाटोदा वनपरिक्षेत्राच्या (शिरूर का ) येथिल वनकर्मचार्यांना माहिती दिली. मात्र काम चुकार वनकर्मचार्यांनी वरिष्ठांना कळवण्याची साधी तसदीही घेतली नाही.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter

या उलट ऊंटावरून शेळ्या हाकल्या प्रमाणे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार्या गुराखी नागरींकडे फोनवर आगिची माहिती घेण्याचा उद्धटपना केला . राखिव वनक्षेत्रात हजोरो वन्यजीवांसह जैवविविधतेची हानी टाळण्यासाठी माहिती मिळताच वनरक्षक वर्षा गिते, विजय पालवे, नारायण दराडे वनमजुर बाळू दराडे आदी लवाजम्यासह घटनास्थळावर दाखल झाले. यूसूफ सय्यद, मुन्ना सय्यद, भरत फौजी, भैय्या कासूळे (कासवाडी) इतर नागरिकांच्या सहकार्याने प्रयत्नांती पराकाष्टा करून रात्री ऊशिरापर्यंत आग विझवण्यात यश आले . नागरिकांच्या‌ दक्षतेमुळे वह नगर वनविभागाच्या कार्य तत्परतेमुळे दहिवंडी राखिव वनक्षेत्राची मोठी हानी टळली

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....