Monday, April 19, 2021
No menu items!
Home कोरोना आज 732 कोरोनाबाधीत; 5 जणांचा मृत्यू

आज 732 कोरोनाबाधीत; 5 जणांचा मृत्यू


बीड (रिपोर्टर) रोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मृत्यूचा आकडाही वाढत आहे. गेल्या 24 तासात बीड जिल्ह्यात पाच बाधीतांचा मृत्यू झाला असून आज आलेल्या अहवालात तब्बल 732 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


आरोग्य विभागाने काल दिवसभर बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 6496 संशयीतांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये तब्बल 732 जण पॉझिटिव्ह तर 5764 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 127, आष्टी 127, बीड 216, धारूर 17, गेवराई 55, केज 67, माजलगाव 35, परळी 48, पाटोदा 26, शिरूर 6 आणि वडवणी तालुक्यात 8 रूग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात पाच बाधीतांचा मृत्यू झाला असून यामध्ये अंबाजोगाई 65 वर्षीय, आष्टी 55 वर्षीय, केज मध्ये दोघे 65 वर्षीय, माजलगाव 58 वर्षीय असे मृत आहेत

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...