केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली सविस्तर आकडेवारी!
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)):-गेल्या काही दिवसांपासून करोना लसीच्या डोसचा तुटवडा हा चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी लसीचे पुरेसे डोस केंद्राकडून येत नसल्याची तक्रार देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात नेमकं किती लसीकरण झालंय? डोस खरंच कमी पडले आहेत का? याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांना आता खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं असून देशात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाची सविस्तर आकडेवारीच त्यांनी मांडली आहे. त्यासोबतच, गेल्या २ महिन्यांत देशात मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण वाढले असून लोकांचं बेजबाबदार वर्तन त्याला कारणीभूत ठरल्याचं देखील आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमध्ये आत्तापर्यंत दिलेले डोस, कुणाला किती डोस मिळाले, किती आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण पूर्ण झालं आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
गेल्या आठवड्यात भारतात एकाच दिवशी तब्बल ४३ लाख लोकांना लस देण्यात आली. जगभरात एकाच दिवशी झालेल्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा असेल, असं आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये देशात ३६ लाख ९१ हजार ५११ लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.