बीड (रिपोर्टर):- पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यापासून अवैध वाळूचा उपसा सर्रासपणे सुरू आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाया केल्या तरी लपुन छपुन वाळूचा उपसा केला जातो. आज सकाळी पोलीसांनी एक ट्रॅक्टर पकडून त्याच्यावर कारवाई केली. मध्यंतरी तहसीलदारांनी अनेक ठिकाणी कारवाया केल्या होत्या. तरीही वाळूचा उपसा सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळनेर, खुंड्रस, भाटसांगवी, राक्षसभुवन, चव्हाणवाडी यासह अन्य परिसरातील नदी पात्रातून वाळूचा अनाधिकृतपणे उपसा सुरू आहे. वाळू माफिया रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी वाळू घेऊन जातात. काही दिवसापूर्वीच तहसीलदारांनी अनेक वाळूच्या गाड्यावर कारवाया करत वाळू साठ्यावर छापे मारले होते. कारवाया करूनही वाळूचा उपसा सुरूच दिसून येत आहे. आज सकाळी पिंपळनेर पोलीसांंनी एक ट्रॅक्टर पकडला. सदरील हा ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय कारले, निर्डे यांच्यासह आदींनी केली आहे.
वाळूच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते उखडले
वाळूच्या गाड्या पिंपळनेर परिसरातील रस्त्याने रात्र न् दिवस धावत असल्याने यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच रस्ते खराब त्यात पुन्हा वाळूच्या गाड्याची ये-जा वाढल्याने रस्त्याची पुर्नत: वाट लागली. रस्ते दुरूस्त करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.