गेवराई (रिपोर्टर):- जागेच्या वादातून सावत्र भावाला कुर्हाडीचे घाव घालून गंभीर जखमी केल्याची घटना १ एप्रिल रोजी लुखामसला येथे घडली होती. गंभीर जखमीवर उपचार सुरू असताना त्याचा दुसर्या दिवशीमृत्यू झाला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
वैजिनाथ डोमाळे आणि पांडुरंग डोमाळे हे सात्र भाऊ आहेत. ते गेवराई तालुक्यातील लुखामसला येथे राहतात. त्यांच्या दोघांमध्ये जागेच्या कारणावरून सतत वाद होत होते. १ एप्रिल रोजी जागेच्या कारणावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला. या वेळी वैजिनाथ डोमाळे, त्यांची पत्नी व मुलगा योगेश डोमाळे यांनी संगनमत करून पांडुरंग भगवान डोमाळे (वय ३८) यांना कुर्हाडीचे घाव घालून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी पांडुरंग डोमाळे यांना उपचारासाठी गेवराई, बीड आणि त्यानंतर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दुसर्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा अंबाजोगाईत मृत्यू झाला. त्यानंतर काल मयत पांडुरंग डोमाळे यांची पत्नी उर्मिला यांच्या फिर्यादीवरून वैजिनाथ डोमाळे, योगेश डोमाळे, रेणुका डोमाळे यांच्या विरोधात कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय साबळे हे करत आहेत.