लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीचा ईशारा, व्यापार्यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंद लादत सर्व दुकाने बंद करण्यात आले. यामुळे व्यावसायिकांसह मजुरांवर उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊन हटवण्यात यावे, या मागणीसाठी सर्व व्यापार्यांनी आज जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेतली. लॉकडाऊन न हटवल्यास मंगळवारपासून व्यापारी दुकाने उघडणार असल्याचा इशारा लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी अनेक व्यापार्यांची उपस्थिती होती.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter
दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निबर्ंंध लादले. सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यवहार बंद असल्याने त्याचा परिणाम व्यावसायिक, मजूर, कामगार यांच्यावर होऊ लागला. मार्केट बंद असल्याने सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या प्रचंड प्रमाणात खालावला आहे. लॉकडाऊन उठवण्यात यावे नसता मंगळवारपासून व्यापारी आपले दुकाने उघडणार असल्याचा इशारा आज लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आला. व्यापार्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले. या वेळी अशोक हिंगे, शेख शफिक, अशोक येडे, भास्कर गायकवाड, धनंजय गुंदेकर, मौलाना जाकेर, मुफ्ती अब्दुल्ला, उदय जोगदंड, अमोल भांडेकर, हेमंत बेद्रे, दीपक जोजारे, गौतम बिडवे, दिलीप वखरे, फय्याज कुरेशी, संतोष गोरे, ज्ञानेश्वर जवकर, रुपेश संघानी, संदीप शेटे, शंकर सुरवसे, चंदन दातवाणी, मंगेश लोळगे, धम्मानंद वाघमारे, दत्ता प्रभाळे, रामधन जमाले, नितीन सोनवणे, संतोष जोगदंड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.