बीड (रिपोर्टर):- आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून सोमवारी सकाळी आठपर्यंत कडक संचारबंदी असून या कालावधीमध्ये मेडिकल दुकाने, दवाखाना वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राज्यात लावले आहे. विकेंडला म्हणजे शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र संचारबंदी लावली आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही मेडिकल दुकाने, दवाखाने वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील वाहतुक व्यवस्थाही बंद राहणार आहे. मात्र जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात प्रवास करणारी वाहने यांना यातून वगळण्यात आलेली आहे. शनिवार, रविवार सोडता संचारबंदी नव्हती. मात्र शनिवार, रविवार विकेंडला राज्य सरकारने संचारबंदी जाहिर केलेली आहे. त्याची कडक अंमलबजावणी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये रूग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी सूट दिली जाणार आहे. रूग्ण वाहिकेलाही यातून वगळण्यात आले आहे. मेडिकल दुकाने आणि सर्व खासगी दवाखानेही या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दवाखान्याचे कारण, अंत्यसंस्कार वगैरे कारण सोडता घराबाहेर पडू नये असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.