बीड (रिपोर्टर) लिंबागणेश ते जामखेड असा बसने प्रवास करणार्या एका तीस वर्षीय महिलेचे दागिणे असलेली बॅग अज्ञात महिलेने लंपास केली. हि घटना 30 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी काल पाटोदा पोलिसात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रिती ाबासाहे बलाढे (वय 31, रा.दौंड ता.दौंड जि.पुणे) या महिलेने पाटोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या दि.30 नोव्हेंबर 2022 रोजी लिंबागणेश ते जामखेड बसने प्रवास करत असताना चुंभळी फाटा ते सौताडा घाट दरम्यान त्यांच्या जवळ एक अनोळखी महिला बसली. त्या महिलेने बॅगेत ठेवलेले झुंबर, वेल, नाकातील खडा असे 45 हजाराचे दागिणे काढून घेतले असल्याची फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर गुन्ह दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस ठाण्याचे पोलिस हवलदार सारूक हे करत आहेत.