बीड (रिपोर्टर) ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या आहेत. प्रशासनाने उपसरपंच निवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. उपसरपंचाच्या निवडीमध्ये समान मते पडली तरच एक अधिकचे निर्णायक मत द्यायचा अधिकार सरपंचाला देण्यात आलेला आहे.
उपसरपंच निवडीचा कार्यक्रम तारखावाईज जिल्हा प्रशासनाने घोषीत केेला आहे. सात सदस्य असलेल्या अनेक ग्रामपंचायतमध्ये एका गटाचे चार आणि एका गटाचे तीन, तर काही ठिकाणी नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे एका गटाचे चार आणि एका गटाचे 5 असे सदस्य निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये फोडाफोडीचे राजकारण करून उपसरपंच निवडीमध्ये समसमान मते पडली तर एक अधिकचे निर्णायक मत देण्याचा अधिकार राज्य सरकारने सरपंचाला दिलेला आहे. समान मते पडली तरच अधिकचे मत सरपंचाला मिळणार आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये फोडाफोडीचे राजकारण करताना सरपंचाला एक मत की दोन मत असा संभ्रम निर्माण झालेला आहे. या संभ्रमातून दोलायमान परिस्थितीमध्ये एक किवा दोन ग्रा.पं. सदस्य फोडून किमान सरपंच आपल्या गटाचा निवडून आहे नही तर उपसरपंच तरी आपल्या गटाचा असावा म्हणून संभ्रमावस्थेत ग्रामपंचायत सदस्य फोडाफोडी सुरू आहे. त्यामुळे समान मते पडली तरच अधिकचे एक मत उपसरपंच निवडीत सरपंचाला मिळणार आहे.