Home बीड शिदोड शिवारात जुगार अड्‌ड्यावर धाड बारा जुगार्‍यांना घेतले ताब्यात बीड ग्रामीण पोलीसांची...

शिदोड शिवारात जुगार अड्‌ड्यावर धाड बारा जुगार्‍यांना घेतले ताब्यात बीड ग्रामीण पोलीसांची कारवाई


बीड (रिपोर्टर):- शिदोड शिवारातील प्रकाश गायकवाड यांच्या शेतात लिंबाच्य झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे यांना मिळताच त्यांनी काल टिमसह तेथे धाड टाकली असता बारा जुगारी जुगार खेळताना आढळून आले. या वेळी त्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील जुगाराच्या साहित्यासह नगदी मुद्देमाल जप्त केला. जुगार्‍यांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter


बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एपीआय योगेश उबाळे यांना शिदोड शिवारात प्रकाश गायकवाड यांच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सोबत पोलीस उपनिरीक्षक राजपुत, पो.ना. जाधव, पो.कॉ. डोईफोडे, घटमळ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी धाड टाकली असता तेथे १२ जुगारी जुगार खेळताना मिळून आले. त्यामध्ये राम श्रीरंग पवार (रा. अयोध्यानगर, बीड), किशोर बबन जाधव (रा.शास्त्रीनगर नाळवंडी नाका बीड), जालिंदर माणिकराव हातागळे (रामतिर्थ बीड), विनोद ग्यानबा भालशंकर (रा. बहिरवाडी बीड), बॉबी ऊर्फ संदेश दीपक गायकवाड (रा. बहिरवाडी बीड), विजय राम रोटके (काळा हनुमान ठाणा, बीड), इकराम खान मुकर्रम खान पठाण (रा. किल्ला मैदान, बीड) आनंद राजेंद्र कांबळे (रा. गांधीनगर, बीड), अरबाज नय्युम पठाण (रा. रामतीर्थ,एमआयडीसी बीड), उत्कर्ष शिवाजी मोमीन (रा.रामतीर्थ, बीड), राहुल राजेंद्र गायकवाड (रा. गांधीनगर बीड), शेख आसेफ शेख नसीर (रा. शाहूनगर, बीड) हे जुगारी मिळून आले. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version