स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड (रिपोर्टर) आष्टी, शिरूर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत होत्या. गेल्या 17 डिसेंबर रोजी तालुक्यातील मुर्शदपूर येथील डॉ. अविनाश पवळ यांच्या घरात्या दरवाज्याचे कडी-कोंडा तोडून अज्ञात चार चोरट्यांनी घरात प्रवेश करत काठीचा धाक दाखवून सोने-चांदीसह नगदी रोख रकमेची चोरी केली. सदरच्या घटनेने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाला गती देत यातील एका आरोपीला ताब्यात घेतले.
मुर्शदपूर या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेप्रकरणी महत्वाची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला झाली. सदरचा गुन्हा निबांळकर आसाराम भोसले रा. चिंचोडी पाटील ता. जि. अहमदनगर यांनी त्याचे साथीदारसह केला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्या नंतर 27 डिसेंबर रोजी सदर आरोपीस चिचोडी पाटील येथून ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच पोलीस ठाणे शिरुर हददीमध्ये मागिल दोन महिण्यापुर्वी मानुर शिवारात सिध्देश्वर वस्तीवर व सिरसाट वस्तीवर मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिली सदरील पो. स्टेला गु.र.न 150/2022 कलम 394,34 भादवि व गु.र.न 158 / 2022 कलम 394,323,34 भादवि प्रमाणे गुन्हे दाखल झाला आहे सदर आरोपी कडुन एकुण (3) गुन्हे उघडकिस आले आहेत. तसेच इतर जिल्हयातील देखील गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपी नामे निबांळकर आसाराम भोसले रा. चिंचोडी पाटील ता. जि. अहमदनगर यास पो.स्टे. आष्टी गुरनं 414/2022 कलम 392,34 भादंवि चे तपासकामी पो.स्टे. आष्टी यांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास पो.स्टे. आष्टी व स्था.गु.शा. चे पथक करीत आहे. आरोपीतांकडुन अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरिक्षक सतिष वाघ, पो. उपनि भगतसिंग दुलत, पोह मनोज वाघ,प्रसाद कदम, रामदास तादंळे, पोना-सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, विकी सुरवसे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे