Monday, January 24, 2022
No menu items!
Homeकोरोना'गजनी बायडन' म्हणत कंगनाकडून अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवर टीका; कमला हॅरिस यांचं मात्र...

‘गजनी बायडन’ म्हणत कंगनाकडून अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवर टीका; कमला हॅरिस यांचं मात्र समर्थन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती जगभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवरही भाष्य करत असते. ती बॉलिवूड, राजकीय आणि अनेक सामाजिक मुद्द्यावर आपली मतं मांडत असते. बऱ्याचदा कंगनाने मांडेल्या मतांवरून अनेक चाहते तिचं समर्थन करतात, तर अनेकजण तिच्यावर टिकाही करतात. अभिनेत्री कंगना रनौतने आता अमेरिका निवडणुकांच्या जाहीर झालेल्या निकालावर भाष्य केलं आहे. तिने अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं समर्थन केलं आहे. मात्र नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर मात्र टीका केली आहे.

कंगना रनौतने अमेरिकेचे नव्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट केलं आहे की, “गजनी बायडन यांचा काही भरोसा नाही, ज्यांचा डाटा दर 5 मिनिटांनी क्रॅश होतो, एवढी सगळी औषधं त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ते एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे की, पुढे जाऊन कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष म्हणून कमान सांभाळतील. जेव्हा एक महिला उठून उभी राहते, त्यावेळी ती दुसऱ्या महिलेसाठीही रस्ता तयार करते. हा ऐतिहासिक दिवस साजरा करा.”

दरम्यान, अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आलं आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनियामधील मतमोजणी अखेर संपली आणि जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

मी देशाला तोडणारा नाही तर जोडणारा राष्ट्रपती : जो बायडन

विजयानंतर आपले गृह राज्य डेलावेयरमधील विलमिंगटनमध्ये संबोधित करताना बायडन यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, 7.4 कोटींहून अधिक अमेरिकन लोकांनी मला मतं दिली आहेत. ते म्हणाले की, मी राष्ट्रपती म्हणून ब्लू किंवा रेड स्टेट असं न पाहता यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका असं राष्ट्राकडे पाहील.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!