Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाधनंजयांच्या पालकत्वाचं जिल्ह्याला ऑक्सिजन स्वाराती, लोखंडी सावरगाव कोविड सेंटरला टँकरने ऑक्सिजन उपलब्ध

धनंजयांच्या पालकत्वाचं जिल्ह्याला ऑक्सिजन स्वाराती, लोखंडी सावरगाव कोविड सेंटरला टँकरने ऑक्सिजन उपलब्ध

कोविड काळात घेतल्या 15 पेक्षा अधिक आढावा बैठका
ऑक्सिजनचा तुटवडा असणार्‍या स्वाराती, लोखंडी सावरगाव कोविड सेंटरला टँकरने ऑक्सिजन उपलब्ध
बीड/अंबाजोगाई (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयातला ऑक्सिजन साठा संपण्याच्या मार्गावर होता. ऑक्सिजनसाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात होते. परंतु ऑक्सिजन मिळत नसल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली होती परंतु काल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेत ज्या कोविड सेंटरमध्ये सुविधा कमी आहेत त्या तात्काळ पुरविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अंबाजोगाई स्वारातीला 10 केएल आणि लोखंडी सावरगाव कोविड सेंटरला 5 केएलचे ऑक्सिजन टँकर तात्काळ उपलब्ध झाल्याने तेथील गंभीर रुग्णांवरचे उपचार पुन्हा सुरळीत सुरू झाले आहेत.
   राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात कोरोनाबाबत अधिक दक्ष राहत जिल्ह्यातील जनतेला कुठल्याही सुविधा कमी पडणार नाहीत, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आजपर्यंत कोरोनाबाबतच्या आढाव्यासाठी त्यांनी 15 पेक्षा अधिक बैठका घेतल्या. या काळात पालकमंत्री मुंडे यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली. मात्र त्यानंतरही मुंडेंनी जिल्हावासियांना वार्‍यावर न सोडता त्यांच्या आरोग्याची काळजी कायम घेतली. सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत आहे. गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांची संख्याही तेवढीच आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती आणि लोखंडी सावरगाव कोविड सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. स्वारातीचे अधिष्ठाता यांनी परवा स्वत: लातूरला जावून ऑक्सिजनची व्यवस्था केली होती. त्यानंतर काल पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोरोनाबाबतचा आढावा घेतला. यात बारीक-सारीक गोष्टींवर चर्चा करत आलेल्या संकटावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर मार्गदर्शन करत बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना उपचारात कुठलीही कमतरता भासणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अंबाजोगाई आणि लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यचे सांगण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी तात्काळ यात लक्ष घालून आज सकाळी अंबाजोगाईसाठी 10 केएल तर लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरसाठी 5 केएल ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून दिले. धनंजय मुंडे हे पालकमंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्यात उपस्थित होणार्‍या प्रश्‍नावर उत्तर मिळत असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!