Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाडेअरीवरील दुधाचे पैसे लवकर मिळत नाही लॉकडाऊनच्या कार्यकाळात शेतकरी अडचणीत

डेअरीवरील दुधाचे पैसे लवकर मिळत नाही लॉकडाऊनच्या कार्यकाळात शेतकरी अडचणीत

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असून बहुतांश दुध उत्पादक शेतकरी आपले दुध शासकीय डेअरीला विक्री करतात. डेअरीवर आठ दिवसाला पैसे मिळत असतात मात्र पंधरा ते वीस दिवसानंतरही डेअरीचे पैसे मिळत नसल्याने लॉकडाऊनच्या कार्यकाळात शेतकरी अडचणीत सापडला. वेळेवर शेतकर्‍यांचा पैसे देण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
बीड जिल्ह्यात म्हशी आणि गाईचे पालन मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुधाचे उत्पादन चांगले निघते. जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी यासह अन्य तालुक्यातील शेतकर्‍यांनी गाईचे पालन केले असून येथील शेतकरी शासकीय आणि खासगी डेअरीवर दुधाची विक्री करतात तर बीड, अंंबाजोगाई, गेवराई, माजलगाव यासह अन्य विभागातील शेतकर्‍यांनी गाईसह म्हशींचे पालन केलेले आहे. येथील शेतकरीही आपल्या सोयीनुसार शासकीय दुध डेअरीसह इतर ठिकाणी दुधाची विक्री करत असून शासकीय दुध डेअरीवर आठ दिवसाआड पैसे दिले जातात मात्र बीड तालुक्यातील शेतकर्‍यांना १५ आणि २० दिवसानंतरही पैसे मिळत नसल्याने लॉकडाऊनच्या कार्यकाळात शेतकरी अडचणीत सापडला आहे. पेंढीचे आणि कडब्याचे भाव गगनाला भिडले, अशा परिस्थितीत दुधाचे पैसे योग्य वेळी मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक बाबतीत अडचणीत सापडल्याने दुध संघाने शेतकर्‍यांना दहा दिवसाला पेमेंट अदा करावे, अशी मागणी बीड तालुक्यातील दुध उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!